आ.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने उथळपेठ येथे २.५० कोटी रु. किमतीचे वाचनालयाचे बांधकाम मंजुर

62

मूल  :-

‘ग्रंथालये ही ज्ञानाची सदावर्ते’ या उक्‍तीनुसार ग्रंथचळवळीचे महत्‍व सर्वसामान्‍य नागरिकांमध्‍ये रुजावे, वाचनाविषयी गोडी निर्माण व्‍हावी यासाठी सतत प्रयत्‍नशील असलेले विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल तालुक्‍यातील उथळपेठ येथे खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन २.५० कोटी रु. किंमतीच्‍या वाचनालय इमारतीच्‍या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे.

जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी या वाचनालयाच्‍या इमारत बांधकामाला खनिज विकास प्रतिष्‍ठानच्‍या माध्‍यमातुन २ कोटी ५० लक्ष रु. किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला मान्‍यता प्रदान केली आहे. आता उथळपेठ येथे अतिशय आकर्षक व ग्रंथसमृध्‍द वाचनालय उभारण्‍यात येणार आहे. १९९९ मध्‍ये चंद्रपूरात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन वाचनालयाची इमारत उभारली. या ठिकाणी ५ हजाराच्‍या वर ग्रंथसंपदा उपलब्‍ध आहे. स्‍पर्धा परिक्षांच्‍या तयारीसाठी आवश्‍यक पुस्‍तके या वाचनालयात उपलब्‍ध असुन या ठिकाणच्‍या अभ्‍यासिकेचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहे. चंद्रपूर प्रमाणेच बल्‍लारपूर, मुल आणि पोंभुर्णा या शहरांमध्‍ये वाचनालय व अभ्‍यासिका आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सुरु करण्‍यात आल्‍या आहेत. अर्थमंत्री असताना चंद्रपूरात कै.बाबा आमटे अभ्‍यासिका त्‍यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या सेवेत त्‍यांनी रुजू केली. त्‍यांच्‍याच सुचनेनुसार बल्‍लारपूर नगर परिषदेने स्‍व. सुषमा स्‍वराज ई-लायब्ररी सुध्‍दा सुरु केली आहे, शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक मिळावी माहिती मिळावी यासाठी अर्थमंत्री असताना प्रत्येक गावात कृषी वाचनालय निर्माण करण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविला. आता उथळपेठ येथे या वाचनालयाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण भागात ग्रंथचळवळीचे महत्‍व रुजणार आहे.

आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने उथळपेठ येथे अंतर्गत रस्‍त्‍यांचे सिमेंटीकरण, गायमुख या पर्यटन स्‍थळाचे सौंदर्यीकरण, व्‍यायामशाळेचे बांधकाम, माता मंदिराचा जिर्णोध्‍दार, सामाजिक सभागृहाचे बांधकाम, घरोघरी सौरदिवे आदी विकासकामांसह बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील पहिले जलशुध्‍दीकरण संयंत्र उथळपेठ येथे बसविण्‍यात आले आहे. हे गाव सर्वार्थाने आदर्श गाव म्‍हणून विकसीत व्‍हावे असा आ. मुनगंटीवार यांचा मानस आहे. येथील आकर्षक वाचनालयामुळे गावाच्‍या विकासात मोलाची भर घातली जाणार आहे.