डिझेल, पेट्रोल, गॅस तसेच जिवनावश्यक वस्तुचे दरवाढ कमी करा  युवक बिरादरी संघटनेची मागणी

95

मूल:-
डिझेल, पेट्रोल, गॅस तसेच जिवनावश्यक वस्तुचे दरवाढ कमी करा या मागणी साठी युवक बिरादरी संघटना, विदर्भ लोक अंादोलन समिती मुल तर्फे पंतप्रधानांना आज निवेदन पाठविण्यात आले.
विदर्भ राज्य आंदोलन समिती मुल व मुल तालुका युवक बिरादरी संघटना च्या वतीने पंतप्रधानांना उपविभागीय अधिकारी मुल यांच्या मार्फतीने निवेदन पाठविण्यात आले आहे, निवेदनात देशात जिवनावश्यक वस्तु अन्न, धान्य, डिझेल, पेट्रोल व गॅस इत्यादी दरवाढी मुळे जनतेचे जिवन जगणे फार अवघड झाले आहे, कोवीड 19 परिस्थीतीमुळे अनेकांच्या नौक¬Úया गेल्या असुन महागाईमुळे जनतेचे जिवन जगणे फार कठिण झाले आहे. गेल्या 7 वर्षापासुन देशात महागाईने उच्चांकी गाठली असुन देशात फार गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. तरी सरकारकडून याविषयावर जनतेला सहाय होईल असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारने देशातील महागाई नियंत्रणात आणने फार महत्वाचे आहे, मनमानी असल्यासारखे कंपण्या जिवनावश्यक वस्तुचे दर आपल्या मताने वाढवत आहे तरीही सरकार बघ्याची भुमीका घेत आहे, यामुळे जनतेने जगावे की मरावे ? याकरीता जिवनावश्यक वस्तु अन्न, धान्य, डिझेल, पेट्रोल व गॅस इत्यादी वस्तुचे दरवाढ लवकरात लवकर कमी करावे जेणेकरून जनतेचे जिवन जगणे सुखकर होईल याप्रमाणे मागण्या निवेदनात केले आहे, निवेदन तहसिलदार रविंद्र होळी यांनी स्विकारले यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे व मुल तालुका युवक बिरादरी संघटनेचे अध्यक्ष कवडूजी येनप्रेड्डीवार अध्यक्ष यांनी सांगीतले की, जबरानजोत जमिनीकरीता तीन पीढ्याची अट रद्य करण्याकरीता केंद्र सरकारशी पाठपुरावा सुरू आहे, तसेच जबरानजोत शेतक.Úयांना जमिनीचे पट्टे देण्या बाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणीसुध्दा यावेळी केली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे व मुल तालुका युवक बिरादरी संघटनेचे अध्यक्ष कवडूजी येनप्रेड्डीवार, पदाधिकारी अशोक मार्गनवार, नितेश येनप्रेड्डीवार, मुंकदा खोडपे, शुभम शेंडे, संपत कान्हु जेंगठे, रामाजी बिराजी कन्नमवार, प्रकाश सोयाम, अरूण जोगे, खुशाल तुकाराम रामेटेके, पुरूषोत्तम सिडाम, गजानन पोरटे, शंकुतला कर्रेवार, , पांडूरंग सिडाम, बंडूजी वानखेडे, परशुराम मेश्राम, कारू गेडाम, लिलाबाई शेंडे, येश्वदाबाई शेंडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.