क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन

41

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन
मूल (प्रमोद मशाखेत्री ) : इंग्रजांच्या राजवटीत स्थायी धर्मांतर, अन्यायी, जुलमी, सावकारी धोरण, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द उलगुलान करीत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची दिशा बदलून वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या, तत्कालीन अखंड भारतातील तरुणांना देशप्रेमाची प्रेरणा देऊन क्रांतीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

शाखेचे अध्यक्ष अशोक येरमे यांच्या अध्यक्षतेखाली चित्रकार भारत सलाम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी आदिवासी विकास परीषदेचे बंडू गेडाम, हेमंत कन्नाके, दीपक मडावी, बंडू परचाके, मनीष कन्नाके, अल्का मडावी, मंजूषा येरमे, अनुसया मडावी, सावित्रीबाई पंधरे, योगिता मडावी आदी समाजबांधव उपस्थित होते.