काटेरी तार /ताडपत्री/बॉटरी चलीत पंप/सेंद्रिय खत ,योजनांचा फायदा घ्यावा सभापती चंदू मारगोनवार

31

काटेरी तार /ताडपत्री/बॉटरी चलीत पंप/सेंद्रिय खत

मूल :-  जि. प. सेसफड/स्वनिधी/7वनमहसुल/14समाजकल्याण योजना सन 20.21अंतर्गत काटेरी तार /ताडपत्री/बॉटरी चलीत पंप/शेंद्रीय खत अनुदानीत दराने मिळत आहे.  लाभाथ्र्यानी पंचायत समितीमध्ये अर्ज व कागदपत्रे जमा करावे.असे आवाहन सभापती चंदू मारगोनवार यांनी कळविले आहे                                   

            सोबत येतांना सातबारा/ गाव नमुना अ /पाणी परवाना/विद्युत डिमांड पावती

              नकाशा/जातीचा दाखला /आधार कार्ड बॅंक पासबुक छायांकीत प्रत

 

शेतक-यांना  75 टक्के अनुदानावर सेंद्रिय खताचे वाटप :-

उद्देश :- सेंद्रिय शेतीकडे शेतक-याचा कल वाढविण्याकरता सदर योजनेतून जिल्हयातील शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर सेंद्रिय खताचे वाटप करण्यात येते.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- जैविक खते, सेंद्रिय खते इत्यादिंवर 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागेल.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)

 

शेतक-याना 75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे.
उद्देश :- पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता 75 टक्के अनुदानावर शेतक-यांना काटेरी तारेचे व खांबाचे वाटप करण्यात येते.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत
लाभाचे स्वरूप :- प्रती लाभार्थी साधरणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)