मुल तालुक्यात लहान मुलांसाठी कोविड वार्ड सुरु करण्यात यावे :- शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांची मागणी

39

 

कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रात आली असतांना लहान मुलांना धोका असणारी तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञाकडून देण्यात आल्यामुळे शासनाने सतर्कता म्हणून आतापासून तयारी सुरु केली आहे. मुल तालुयातील प्रमुख रुग्णालयासह कोविड सेंटर्समध्ये लहान मुलांसाठी कोविड बालरुग्ण विभाग सुरु करण्यात यावे अशी मागणी मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे उदय सामंत साहेब चंद्रपूर जिल्हासाठी अत्याधुनिक व्हेनटीलेटर लोकार्पण प्रसंगी आले होते . चंद्रपूर जिल्हात कोरोनाची दुसरी लाट आता चांगलीच नियंत्रणात आली आहे. वेगाने केलेल्या चाचण्या, पाॅझिटीव्ह रुग्णावर उपचार आणि प्रभावी क्वारंटाइन यामुळेच रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे मंत्री महोदयास शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी सांगितले. कोरोना लढयात ‘मुंबई पॅटर्ण’ देशात सर्वोत्कुष्ट ठरत असल्याने सर्वोच्य न्यायालय, ‘निती’ आयोगानेही कौतुक केले. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सक्षम ठेवावी लागणार आहे कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त लागण होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्भूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार नेमलेल्या विशेष ‘टाक्स फोर्स’ च्या निर्देशानुसार नियोजन करण्यात आले असल्यामुळे मुल तालुक्यात लहान मुलासाठी कोविड वार्ड सुरु करण्याची मागणी येरोजवार यांनी केली आहे .‘टाॅक्स फोर्स च्या आतापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हात जम्बो कोविड सेंटर्समध्ये लहान मुलांसाठी आरोग्य व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात यावा . सध्यास्थितीत सर्व नर्सिग होममध्ये लहान मुलांवर उपचार सुरु आहेत. बालरुग्ण वार्डसाठी बेडची वेगळी रचना, वार्डची खास रचना, सोयी सुविधा तयार करण्यात याव्या प्रत्येक तालुक्यात च्या ठिकाणी आयसीयु, व्हेटीलेटर, आक्सिजन बेड तेनात करावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी केली आहे याप्रसंगी जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे ,उपतालुका प्रमुख रवी शेरकी,सत्यनारायण अमरदिवार, सुशी दाबगाव सरपंच अनिल सोनुले,विनोद काळबांधे उपस्थित होते