रोपवाटिका योजनेचा शेतक—यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे

59

 

रोपवाटिका योजनेचा शेतक—यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे

 

मुल :- राष्ट्रीय कृषिविकास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका सन 2020—21 अंतर्गत रोपवाटीका या घटकाकरीता लाभ घेण्यासाठी इच्छुक​ शेतक—यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
हा कार्यक्रम राबवितांना मार्गदर्शक सुचनांचे काटकोरपणे अवलंब करणे याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार लाभ देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

शेतक—यांची आ​र्थिक समृध्दी व्हावी,यासाठी शासनाच्या राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरू केली आहे.

यात मुल तालुक्यातून एका लाभार्थीला लाभ देण्यात येणार आहे.सदर योजना सहा लाख 40 हजार रूपये किंमतीची असून लाभार्थी शेतक—यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेतक—यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचा प्रयत्न असून यासाठी रितसर अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ अधिकारी,कृषी पर्यवेक्षक यांच्याशी 28 जूनपर्यंत संपर्क साधावा,असे प्रशांत कसराळे यांनी कळविले आहे.