चंद्रपूर जिल्ह्यात मान्सून दाखल – सर्वदूर जोरदार पाऊस जोरदार वाऱ्यासह शहरात मुसळधार पाऊस – झाडेही कोसळली

49

चंद्रपूर  जिल्हा प्रतिनिधी 

                                          चंद्रपूर जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असुन आज जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असल्याचे वृत्त आहे. आज जवळपास 4 वाजता चंद्रपूर शहरात पावसाळी वातावरण निर्माण झाले व थोड्याच वेळात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.संध्याकाळ होण्यापूर्वीच शहरात मळभ दाटून आल्याने अंधार पडल्याचे दृष्य नागरिकांनी अनुभवले. आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागल्याने रस्त्यात असलेल्या लोकांची त्रेधातिरपीट उडाली. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांना चक्क हेड लाईट सुरू करून वाहने चालवावी लागत होती.शहरातील काही भागात सोसाट्याच्या वार्‍यामुळे झाडे पडली असल्याचे वृत्त असुन काही भागातील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला होता.सुरुवातीलाच पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे धरती मोहरून गेल्याचे भासत आहे त्याचप्रमाणे हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे बळीराजा सुद्धा सुखावला असुन यंदा चांगले पिक होईल अशा अशा पल्लवित झाल्या आहेत.