भेजगाव ग्रामपंचायत तर्फे 14 वित्त आयोगातून बॅग,ड्रेस,बेल्ट,सुज अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप

74

मुल :— ग्रामीण भागातील नागरीक गरीब,निराधार असतात लहान मुलांच्या आवडीनुसार विद्याथ्र्यांना शैक्षणिक साहित्य मिळत नाही व साहित्य फार महत्वाचे व गरजेचे असते ही जाणीव लक्षात घेऊन भेजगाव ग्राम पंचायतीचे सरपंच तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अखिल गांगरेडीवार यांनी भेजगाव,येथील अंगणवाडीच्या विद्याथ्र्यांना देहगाव,मानकापूर,येथे 14 वित्त आयोगातून बॅग,ड्रेस,बेल्ट,सुज अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप सरपंच अखिल गांगरेडीवार यांनी आपल्या ग्रामपंचायतमधील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन साहित्य वाटप केले.
या प्रसंगी संदेश विवेकानंद उराडे,मुकेश ठाकूर,जलित मोहूर्ले,रमेश वेलके,चेतना कुळमेथे,ग्रामविकास अधिकारी मंगर,कर्मचारी अमोल वाढई,प्रविण चटारे,अंगणवाडी सेविका वैशाली गांगरेडीवार,निमा शेंन्डे,शितल वाढई,मालता वाढई,निकुरे, आणि अनेक लहान मुले उपस्थित होते.
लहान मुलांना बॅग,ड्रेस,बेल्ट,सुज असे साहित्य मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेह—यावर आनंद दिसून आला.