लर्निंग लायसन्स मिळेल घरबसल्या, द्यावी लागणार आॅनलाईन परीक्षा,

25

मूल :— आधार कार्ड वरून घरबसल्या वाहनाने शिकाऊ अनुज्ञाप्ती (लर्निंग लायसन्स) मिळणार आहे.वाहन चालविण्यासाठी प्रत्येकाला वाहन चालविण्याचा आरटीओ कडून परवाना काढावा लागतो,मात्र अनेकवेळा वेळ नसतेा किंवा योग्य माहिती नसल्यामुळेपरवाना काढणे त्रासदायक ठरते. त्यातच काहींची दलालांकडून लुटही केली जाते. या सर्व त्रासापासून आता मुक्तता होणार असून,शिकाउु वाहन परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा न मारता घरबसल्या आॅनलाईन चाचणी देउुन वाहन चालविण्याचा परवाना घेता येणार आहे. ही सोय पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार आधार क्रमंाकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रीय सूचना केंद्राने वाहन व सारथी प्रणालीमध्ये बदल केले आहे. या सेवांमध्ये आता घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना चाचणी देणे आणि वाहन वितरकांच्या स्तरावर वाहन क्रमांकही जारी करण्याची सेवा आॅनलाईन केली आहे. त्यामुळे वाहनधारकांना सुविधा होणार असून आरटीओ कार्यालयातील चकरा मारण्याचा त्रास कमी होणार आहे.मात्र तांत्रिक अडचण किंवा आधार कार्ड नसेल तर या सेवांपासून वंचित रहावे लागणार आहे. या सेवा मुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे.