मुदतीनंतर रेतीघाटाचा उपसा केल्यास कायदेशीर कारवाई. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी

43

मूल :- तालुक्यातील रेतीघाटातील उपसा १0 जून २0२१ नंतर बंद होत असून त्यानंतर उपसा करणार्‍या घाट मालकांवर गुन्हा दाखल करून कठोर कावाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दिला आहे. सद्यस्थितीत चालू असलेले रेतीघाट यांची यावर्षीची मुदत १0 जूनला समाप्त होत असून त्यानंतर रेतीघाटावरून उत्खनन अवैध असेल. मुदतीनंतर रेती उत्खनन केल्यास त्या घाट मालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून, गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दिली आहे. त्यामुळे अवैद्य रेती वाहतुक करणा-यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.