नवनिर्मीत अभ्यासिकेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चे नाव द्या-प्रशांत समर्थ यांची मागणी

34

मूल (प्रतिनिधी)
स्थानिक ताडाळा मार्गावरील प्रभाग क्र. ३ मधील सिद्धमशेट्टीवार ले आऊट मध्ये नगर परिषदेने नवीन इमारतीचे बांधकाम केले असुन या सुसज्ज इमारती मध्ये परीसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नगर प्रशासनाने अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर प्रशासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असुन या अभ्यासीकेचा लाभ परीसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. भविष्य घडविण्याच्या उद्देशाने अभ्यासा करीता येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने नवनिर्मीत अभ्यासीकेला प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी नगर परीषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी केली आहे. नगराध्यक्ष रत्नमाला भोयर आणि मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांची शिष्टमंडळासह भेट घेवुन प्रशांत समर्थ यांनी सदर मागणी केली आहे. यावेळी भाजप कार्यकर्ते राकेश ठाकरे, प्रमोद महाडोळे, संतोष ठाकुरवार, विवेक मांदाळे, बादल करपे यांची उपस्थिती होती.