पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणारी वाघीण आढळली मृतावस्थेत

43

चंद्रपूर (प्रतिनिधी ) :— चंद्रपूरमधील ताडोबाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरवर ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्याच ठिकाणी वाघिणीचा मृतदेह आढळला आहे.

परवा म्हणजे गुरुवारी या वाघिणीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यावर ताडोबाच्या बफर क्षेत्रातील डोनी परिसरात हल्ला करून जखमी केले होते.

मृत वाघीण अंदाजे 3 ते 4 वर्षांची असून तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. एखाद्या वन्यप्राण्यासोबत झालेल्या झुंजीत ती जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याच अंदाज वर्तविण्यात येत आहे.