भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या मूल शहर अध्यक्ष पदावर श्री. सुनिल शेरकी

33

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या मूल शहर अध्यक्ष पदावर श्री. सुनिल शेरकी यांची आज नियुक्ती करण्यात आली. राज्याचे बहुजन कल्याण आणि मदत व पुनर्वसन मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी मान.नाम. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी अध्यक्ष मान. संतोषभाऊ रावत यांचे उपस्थितीत नवनियुक्त शहर अध्यक्ष श्री सुनिल शेरकी यांचेसह नवनियुक्त शहर उपाध्यक्ष श्री विनोद कामडे, श्री सुरेश फुलझेले, श्री संदीप मोहबे आणि महासचिव श्री. कैलाश चलाख यांना नियुक्ती पञ देण्यात आले.

      यावेळी तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती श्री घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुका अध्यक्ष श्री राकेश रत्नावार आणि बाजार समिती संचालक तथा सरपंच श्री अखील गांगरेड्डीवार यावेळी उपस्थित होते. नवनियुक्त शहर अध्यक्ष श्री सुनिल शेरकी हे उच्च विद्याविभुषीत असुन ओबीसी चळवळीचे आघाडीचे नेतृत्व आहे. गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य असलेले श्री सुनिल शेरकी उत्तम व अभ्यासु वक्ते सुध्दा आहेत. नियुक्ती बद्दल सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे पालकमंञी नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी अभिनंदन केले आहे.