लोकवस्तीत दारू दुकान सुरू करण्यास बजरंग सेनेचा विरोध

34

लोकवस्तीत दारू दुकान सुरू करण्यास बजरंग सेनेचा विरोध
मूल (प्रतिनिधी)
दारू व्यवसायामूळे होणारा जनतेचा ञास आणि महीलांची सुरक्षितता लक्षात घेवुन सुरू होणारे दारूची दुकान शहराबाहेर सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी बजरंग सेनेनी केली आहे.
जिल्ह्यात झालेल्या दारूबंदी मूळे अनेक गैरकृत्याला चालना मिळाली होती. त्यामुळे जनतेची मागणी आणि वास्तविक परिस्थिती लक्षात घेवुन शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी हटविली. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात पुन्हा अधिकृतरित्या दारूची दुकाने सुरू होणार आहेत. याची संधी साधुन काही दारू विक्रेते मूल शहरात वर्दळीच्या व भरगच्च लोकवस्ती असलेल्या महर्षी वाल्मीकी वार्ड क्र. ६ व ७ येथे पुर्वीच्याच ठिकाणी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात दारूबंदी होण्यापुर्वी सदर वार्डात रहदारीच्या मुख्य मार्गावर बेरडे वाईन शाँप, अग्रवाल वाईन शाँप आणि ढोरे यांचे देशी दारू विक्रीचे दुकान होते. या तिन्ही दारू दुकानांचा नागरीकांना मोठ्या प्रमाणात ञास होता. संध्याकाळच्या सुमारास या दुकानांसमोर दारू शौकीनांची प्रचंड गर्दी राहत असल्याने दारू दुकाना समोरच्या मार्गाने जाण्यास महीलांना असुरक्षित वाटत होते. मार्गावरील गर्दीमूळे वाहण चालकांनाही जीव मुठीत घेवुन वाहन चालवावे लागायचे. गर्दी मूळे या दुकानांसमोर दोनदा जीवघेणे अपघातही झाल्याची वास्तविकता आहे. सदर वार्डाच्या परीसरात पुन्हा दारू व्यवसाय सुरू झाल्यास नागरीकांना जुन्याच समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात सुरू होणारे दारू दुकान मूल शहराच्या महर्षी वाल्मीकी वार्डातचं नव्हे तर लोकवस्ती असलेल्या शहराच्या कोणत्याही परीसरात सुरू करण्यासाठी परवानगी न देता लोकवस्ती पासुन दुर अंतरावर सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा सदर दारू दुकाना विरूध्द जन आंदोलन करू, असा इशारा स्थानिक बजरंग सेनेचे अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, निकेश सुखदेवे, पंकज शेन्डे, जगदीश टिंगुसले, आकाश शेंडे आदींनी तहसिलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दिला आहे.