पावसाळ्यात नागरिकांना त्रास होवू नये यासाठी पावसाळयापूर्वी चे नियोजनासाठी नगराध्याक्षा प्रा रत्नमाला प्रभाकर भोयर

39

मूल :— पावसाळ्यात नागरिकांना त्रास होवू नये यासाठी पावसाळयापूर्वी चे नियोजनासाठी नगराध्याक्षा प्रा रत्नमाला प्रभाकर भोयर यांच्या अध्यक्षतेखाली ,उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. मूल शहरात बांधकाम विभागा तर्फे करण्यात येणारे रस्ते व नाली अर्धवट आहे ते पूर्ण करणे, नालीच्या पाण्याचा उतार दुरस्ती करणे, मंजूर नाल्याचे,रस्त्याचे व नालीचे बांधकाम त्वरीत करणे, नालीवर झाकण टाकणे, नाली बांधकाम झाल्यानंतर रस्त्यावर आवश्यक ठिकाणी उतार करणे, अंदाजपत्रकीय कमी दरातील शिल्लक निधीतून आवश्यक ठिकाणी नागरिकांच्या मागणीनूसार रस्ते व नाली घेणे इ.बाबीवर चर्चा होवून सदर कामे बांधकाम विभागा तर्फे त्वरीत करण्यात यावी .यासाठी बांधकाम विभागाला सूचनापत्र देण्यात आले. बैठक घेण्यातआली सभेला सभापती प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे , नगरसेवक प्रशांत लाडवे, महेंद्र करकाडे, विनोद कामडी ,नगरसेविका आशा गुप्ता, वंदना वाकडे,ललिता फूलझेले, वनमाला कोडापे उपस्थित होते.