उप-जिल्हा रुग्णालय मुल येथे सिजर व सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करिता स्थायी स्त्री रोग तज्ञ नेमण्यात यावे

46

मुल :-  उपजिल्हा रुग्णालय मुल येथे स्थायी स्वरूपात स्त्री रोग तज्ञ नसल्याने ग्रामीण क्षेत्रातील व मुल शहरातील महिलांना मुल उपजिल्हा रुग्णालय असून सुद्धा सिजर किंवा सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करिता सोय नाही. याकरिता चंद्रपूरला जिल्हा रुग्णालयात संदर्भित ( रेफर ) करावे लागते यामुळे मुल तालुक्यातील महिलांना 45 KM दूर जाऊन आपला उपचार करावा लागतो. त्यामुळे गर्भवती महिलांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
             स्थायी स्वरूपात उपजिल्हा रुग्णालय मध्ये स्त्री रोग तज्ञ उपलब्ध झाल्यास सिजर व सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात ची सेवा तालुक्यातील स्त्री रुग्णांना महिलांना मिळेल आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही तरी लवकरात लवकर याकडे लक्ष वेधून महोदय उपजिल्हा रुग्णालय मुल येथे स्थायी स्त्री रोग तज्ञ सिजर व गर्भपात करिता नेमण्यात यावे अशी मागणी मा.तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मा. जिल्हा शल्य चिकित्सक साहेब चंद्रपूर यांच्याकडे निवेदन मार्फत मागणी करण्यात आली.ही मागणी पूर्ण झाली नाही तर, युवा वर्ग आक्रमक पवित्रा घेणार व काही अनुचित प्रकार घडल्यास याला संबंधित प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा देखील निवेदन मार्फत देण्यात आला. निवेदन देतांना निखिल वाढई,प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, निहाल गेडाम, उपस्थित होते.