शेतक—यांनी शासनाच्या फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, गटविकास अधिकारी डॉ.मयूर कळसे यांचे आव्हान

51

मूल :— मुल तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांनी शासनाच्या फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मुल पंचायत ​समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ.मयूर कळसे यांनी तालुक्यातील समस्त शेतकरी बंधवांना केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मधील तरतुदीनुसार शेतक—यांच्या शेतावर आणि बांधावर तसेच पडीत असलेल्या शेतजमीनीवर फळबाग लागवड कार्यक्रम कृषी व फलोत्पादन विभागाचे मार्फतीने हाती घेण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शन सूचने नुसार हा शेतक—यांच्या हिताचा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून दिनांक 1 जून 2021 ते 30/10/2021 पर्यंत फळ लागवडीचा मुदत दिलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणा—या या कार्यक्रमाचे प्रशासनाचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
                 29 ते 31 मे पर्यंत ग्राम पंचायत स्तरावर फळबाग येाजनेची जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतक—यांच्या बांधावर व पडीत जागेवर कोरडवाहू,फळ वृक्षम्हणूनआंबा,काजू,बोर,सीताफळ,आवळा,चिंच,कवठ,जांभूळ,कोकम,फणस,बांबू,करंज, नारळ,पेरू,लिंबू,साग,गिरीपुष्प सोनचाफा, कडीपत्ता,कडुलिंब,सिंधी,शेवगा,चिंच,जटोफा व इतर औषधीयुक्त वनस्पतीची लागवड करण्यात येणार आहे.
करिता संबंधित लाभ घेऊ इच्छिणा—या शेतकरी लाभाथ्र्याना शासनाच्या प्रपत्र ‘ब’मध्ये ठराविक नमुन्यात अर्ज करावयाचा आहे.
अर्जासोबत शेतीचा सातबारा,नमुना आठ,जातीचा दाखला,नरेगा जॉबकार्ड,सातबा—यावर एकापेक्षा जास्त नाव असल्यासत्यांचे सहमती पत्र इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक असून मूल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या फळबाग योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान संवर्ग विकास अधिकारी डॉ.मयूर कळसे यांनी केले आहे.