मूल तालुक्यासाठी देण्यात आलेल्या रुग्ण वाहिका व शव वाहिकेचे छोटेखानी लोकार्पण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार

31

मूल (प्रतिनिधी) देशाला हादरवुन सोडणाऱ्या कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी सामुहीक व संघटीत प्रयत्नाची गरज असुन कोरोना प्रतिबंधक लसींचा लाभ घेण्यासाठी भाजपच्या  कार्यकर्त्यांनी निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदारांना मतांसाठी बाहेर काढता त्याप्रमाणे नागरीकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर आवर्जुन पाठवावे असे आवाहन माजी  मंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. कोरोनाच्या लढ्यासाठी स्थानिक विकास निधीमधून मूल तालुक्यासाठी देण्यात आलेल्या रुग्ण वाहिका व शव वाहिकेचे छोटेखानी लोकार्पण कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस असल्याचे सांगत ना. नितीन गडकरी यांना जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या. म्युकरमायकोसीसच्या उपाय योजने बाबत आपण सर्वप्रथम मागणी केली असल्याचे सांगतांना महात्मा फुले आरोग्य  योजनेत खनिज विकास निधीमधुन ५ लक्ष रुपयाची तरतुद करण्यात येत असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले. 

माँक्स हे कोरोना लढाईतील शस्ञ असल्याने सामान्य नागरीकांना चांगल्या प्रतिचे माँक्स उपलब्ध व्हावे म्हणुन जिल्ह्यात २० लाख माँक्स वाटप  करणार असल्याचे सांगतांना कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, डाँक्टर्स व परीचारीका, अंगणवाडी व आशा वर्कस व अन्य आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी

 यांनी यशस्वी लढा दिल्याबद्दल सर्व कोरोना योद्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्ण वाहिका व शव वाहिकेचे फित कापून व हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले. यावेळी जि. प.अध्यक्ष तथा भाजपच्या तालुकाध्यक्ष  संध्याताई गुरनुले आणि नगराध्यक्ष रत्नमाला भोयर उपस्थित होत्या.  नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी रूग्णवाहीकेचे , पुढील ? जन केले. यावेळी न.प. उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, सभापती प्रशांत समर्थ, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगर सेवक महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, चंद्रकांत आष्टणकर, प्रशांत लाडवे, शांता मादाडे, प्रभा चौथाले, आशा गुप्ता, ललिता फुलझेले, विनोद कामडे, वंदना वाकडे, योगेश सिडाम, भाजपा ओबीसी सेलचे राकेश ठाकरे,  प्रवीण मोहूर्ले, बबन गुंडावार, किशोर कापगते, सुखदेव चौथाले, बालगोविंद आदे आदींसह भाजपा कार्यकर्ते व निमंञीत उपस्थित होते.