पोलीस स्टे. मुल ची धडक कारवाई

26

मुल – दिनांक 28 मे 2021 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुज तारे यांच्या जिल्हा गस्त दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही इसम दोन ट्रकमध्ये अवैध्यरित्या जनावरे घेऊन सिंदेवाही कडून मुल मार्गे जात आहे. अश्या माहितीवरून तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे रात्री 4.00 वाजता पासून प्रशासकीय भवन मुलच्या समोर मेन रोड वर नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे सिंदेवाही कडून दोन ट्रक येताना दिसले. सदर ट्रक ला थांबविण्याचा इशारा देऊन ट्रक थांबविण्यात आला. ट्रक चालकांकडून विचारपूस करून दोन्ही ट्रकची पाहणी केली असता mh34-bg-3062 ट्रक मध्ये 28 नग गोवंशीय जनावरे प्रत्येकी किंमत अंदाजे 10000 रुपये प्रमाणे 28000 रुपये तर दुसऱ्या ट्रक mh34 – ay-8434 मध्ये 19 नग गोवंशीय जनावरे प्रत्येकी अंदाजे किंमत 10000 प्रमाणे 19000 रुपये व आयचर ( ट्रक ) क्रमांक mh34-bg-3062 व mh34 – ay-8434 किंमत अंदाजे 1400000 रुपये असा एकूण 1870000 रुपयाचा माल मिळून आल्याने पंचा सक्षम पंचनामा करून ताब्यात घेतला.

सदर गुन्ह्यात शेख काशिम शहा मुस्तफिर शहा 45 शिवनगर नागभीड नरेंद्र विश्वनाथ चौधरी 24 नांदगाव तालुका सिंदेवाही आयचर क्र. Mh34 ay-8434 चा चालक अब्दुल रहमान मोहम्मद जगाद शेख 56 शिवनगर ता. नागभीड, सुरेश हरिदास गुरपुडे 35 विलम ता. नागभीड,  सोमेश्वर विठोबा पारखी 35 विलम ता. नागभीड यांना अटक केली असून दोन्ही ट्रकमधील एकूण 74 गोवंशीय जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीने उज्ज्वल गौरक्षण संस्था चंद्रपूर केंद्र लोहारा या संस्थेत दाखल करण्यात आले आहे. 

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात पो. नि. राजपूत व पो.ह.वा. प्रकाश खाडे, भोजराज, प्रफुल कळसकर, जालिंद ठाकरे, वाहन चालक महेबूब शेख यांनी केली.  सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टे. मुल येथे गुन्हा नोंद केला असून सदर घटनेचा तपास पो.उ.प.नि. राठोड करीत आहेत..