Aadhar card प्रिंट बंद केल्याची UIADI ची मोठी घोषणा, आधार कार्डला आता नवा पर्याय

56

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी भारतीय असल्याचा अधिकृत कायदेशीर पुरावा आहे. घर खरेदीपासून ते सीमकार्ड खरेदी करण्यापर्यंत आधारकार्डची आवश्यकता भासते. कोरोना विषाणु विरोधी लस घेण्यासाठी ही आता आधारकार्डची गरज भासतोय. हे आधार कार्ड आपल्याला आधार कार्ड बनविणारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) मार्फत दिले जाते. ज्यामध्ये आपला फोटो, नाव, वय, पत्ता यांसह अन्य माहिती दिलेली असते. परंतु या आधारकार्डबाबत UIDAI ने मोठी घोषणा केली आहे.

UIDAI ने आता मोठ्या आकाराची Aadhar card प्रिंट देण्याचा निर्णय रद्द केला आहे. यासंदर्भातील माहिती UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरून दिली आहे. यावर UIDAI ने म्हटले आहे की, यापुढे ग्राहकांना मोठ्या आकाराची Aadhar card प्रिंट बंद केले आहे. त्याऐवजी क्रेडिट कार्डच्या आकाराचे PVC आधार कार्ड दिले जाणार आहे. याचा दर ५० रुपये निश्चित केला आहे. या PVC कार्डचा आकार डेबिट कार्ड इतकाच लहान आहे. हे कार्ड आधीच्या आधार कार्डपेक्षा तुलनेने लहान असल्याने खिशात किंवा पॅकेटमध्ये सहज ठेवता येणार आहे. UIDAI ने आपल्या वेबसाइटवरून आधार रिप्रिंट करण्याचा पर्याय देखील काढून टाकला आहे.

UIDAI ने ट्विटरवर दिली माहिती

एका व्यक्तीने ट्विटरवर आधारकार्ड हेल्पलाईनवर एक प्रश्न विचारला होता. मी आपले आधारकार्ड रि-प्रिंट करु शकतो का? अशा प्रश्न त्या व्यक्तीने विचारला होता. यावर आधार हेल्पलाईनने उत्तर देत सांगितले की, ही सेवा आता बंद झाली आहे. तुम्ही ऑनलाईन आधार PVC कार्ड ऑर्डर करु शकता.

यूआयडीएआयने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली

एका व्यक्तीने ट्विटरवर आधार कार्ड हेल्पलाईनला प्रश्न विचारला, “मी माझे आधार पत्र पुन्हा छापू शकतो?” मला वेबसाइटवर कोणताही पर्याय दिसत नाही. त्यास उत्तर देताना आधार मदत केंद्राने सांगितले की ही सेवा आता बंद करण्यात आली आहे. आपण ऑनलाइन माध्यमातून आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता.

आधार कार्डला आता नवा पर्याय

UIDAI ने सांगितले की, PVC आधारकार्ड कॅरी करण्यासाठी खूप आहे. याशिवाय जर तुम्हाला आधारकार्ड फ्लेक्सिबल पेपर फॉर्मेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ई-आधारकार्डही मिळवू शकता. याची प्रिंटेड कॉपी देखील आधारकार्डप्रमाणे वैध मानली जाईल.

कसे बनवाल PVC आधार कार्ड

१) PVC आधार कार्ड आधार कार्ड बनवायचे असल्यास प्रथम UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in वर जा.

२) त्यानंतर आधारवर क्लिक करा. येथे ‘Order Aadhaar PVC Card’वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक PAGE OPEN होईल.

३) त्या ओपन PAGE वर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, व्हर्चुअल आईडी नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल.

४) यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड किंवा सिक्युरिटी कोड भरावा लागेल, जो एल्फान्यूमेरिक असेल. येथे तुम्हाला एक लहान कॉलम दिसेल जेथे असे लिहिले असेल की मोबाइल नंबर रजिस्टर नाही. त्यावर काळजीपूर्वक टीक करा.

५) आता एक अल्टरनेटिव नंबर टाकावा लागेल ज्यावर तुम्हाला OTP येईल.

६) OTP टाकल्यानंतर आधार रिप्रिंट होईल.

७) यानंतर ५० रुपये शुल्क भरत तुम्ही घरी हे आधार कार्ड ऑर्डर करु शकता.