स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांची कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात पुण्यतिथी निमित्य सदभावना

84

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांची कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात पुण्यतिथी निमित्य सदभावना मुल- भारताच्या स्वातंत्र्यासाठी नऊवेळा तुरुंगात जाणारे आणि सलग १५ वर्ष तुरुंगवास भोगणारे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतितीचा सदभावना कार्यक्रम मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात घेण्यात आला. स्व.पंडीत नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांचे हस्ते करण्यात येऊन सद्धभावना अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व बाजार समिती संचालक राकेश रत्नावार, आदर्श खरेदी-विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, नगर सेवक विनोद कामडे, सरपंच अखिल गॅंगरेड्डीवार, उपसरपंच राहुल मुरकुटे, सुरेश फुलझेले, युवक कांग्रेसचे पुल्लकवार,व कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.