PSI भरतीबाबत MPSC चा मोठा निर्णय, मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत 60 गुण आवश्यक

39

मुंबई : राज्यातील MPSC ची तयारी करणाऱ्या आणि PSI होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. MPSC ने PSI भरतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार PSI पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरंच विद्यार्थ्यांना मुलाखत देता येणार आहे. आता मैदानी गुण फक्त क्वालिफिकेशनसाठी गृहीत धरले जाणार आहेत, तशी माहिती MPSC ने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आलीय. ( Important decision of MPSC regarding PSI recruitment)

PSI भरतीसाठी विद्यार्थ्यांना आता MPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मैदानी परीक्षेत 60 गुण आवश्यक असणार आहेत. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना मुखालतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. MPSCच्या 2020 मध्ये निघालेल्या जाहिरातीसाठी हा नियम लागू असणार आहे. तशी माहिती MPSC कडून देण्यात आलीय. यापूर्वी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.