उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त एक्स रे मशीन सुरू करा – भाजपाची मागणी

40

उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त एक्स रे मशीन सुरू करा – भाजपाची मागणी

सध्या कोरोना महामारी मध्ये अनेक लोकांना लागण झाल्यानंतर आपल्या फुफ्फुसात किती प्रमाणात संसर्ग झालं आहे आणि त्याचा स्कोर किती आहे हे माहिती करून घेण्यासाठी डॉक्टर लोक रुग्णाला सिटी स्कॅन करायचा सल्ला देत आहेत. सिटी स्कॅन केल्यानंतर फार अत्यल्प लोकांचा स्कोर हा जास्त निघत असतो बाकी संपूर्ण लोकांना मात्र नाहक सिटी स्कॅन काढावे लागते. सुरवातीला एक्स रे काढल्यास बर्याच गोष्टी ह्या एक्स रे रिपोर्ट वरून समजून येतात. अशे असतानाही मात्र विनाकारण सिटी स्कॅन चा सल्ला देऊन रूग्णांना लुबाडले जात आहे. सरकारी दर 2500 Rs असतानाही अनेक खाजगी केंद्रात जादा आकारणी करून रुग्णांना लुबाडले जात आहे.

नुकतेच जागतिक आरोग्य संस्थेने सिटी स्कॅन काढल्यास 200 एक्सरे इतकं रेडिएशन शरीरात जाऊन भविष्यात रुग्णांना कर्करोगासारख्या रोगांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जाहीर केलं आहे. आपल्या मूल परीसरात सिटी स्कॅन ची व्यवस्था नसल्याने रुग्णांना चंद्रपूर सारख्या ठिकाणी जाऊन दिवसभर ताटकळत राहून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या मूल उपजिल्हा रुग्णालयात एक्सरे मशीन उपलब्ध आहे मात्र लहानश्या तांत्रिक बिघाडामुळे ती नादुरुस्त असल्याची प्राथमिक माहिती आहे. ती दुरुस्त झाल्यास कोविड रुग्णांना इथल्या इथेच एक्सरे ची सुविधा उपलब्ध होऊन त्यांना होणार आर्थिक, मानसिक त्रास होणार नाही तसेच विनाकारण सिटी स्कॅन काढल्याने त्यांना भविष्यात आरोग्याचा पण प्रश्न निर्माण होणार नाही .

सर्वच रुग्णाणच इथेच एक्सरे रिपोर्ट बघून त्यांना पुढचा सल्ला द्यायला वैधकीय अधिकारयाना पण सोयीचे होईल, करिता आपणास निवेदन आहे की उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त एक्सरे उपकरण लवकरात लवकर दुरुस्त करून जनतेच्या सेवेत द्यावे ही विनंती अशे निवेदन भाजपचे नगर परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, भाजपा ओ बी सी सेल चे राकेश ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर यांना दिले