मोदी सरकार सुरू करणार 1 लाख LPG डिलिव्हरी सेंटर्स; बिझनेस करण्याचा विचार असेल तर आहे चांगली संधी

52

नवी दिल्ली, 21 मे : सध्याच्या कोरोना काळात जर तुम्ही कोणता नवीन बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. ही संधी आपल्याला केंद्र सरकारकडून मिळणार आहे. एलपीजी डिलिव्हरी सेंटर सुरू करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. कॉमन सर्विस सेंटरकडून (common service centre)  देशात 1 लाख एलपीजी वितरण केंद्र सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. मंत्रालयाच्या अंतर्गत कॉमन सर्विस सेंटरच (CSC) काम चालतं. या योजनेवर सध्या काम सुरू असून पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरू होणार आहे. हे एलपीजी डिलिव्हरी सेंटर ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये सुरू करण्याचे सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना यातून बिझनेस ची संधी मिळू शकणार आहे.

तुम्ही कसे करू शकाल काम..

तुम्ही सध्या एखादा व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर कॉमन सर्व्हिस सेंटर आपल्याला चांगली मदत करेल, कारण त्यांच्याकडे व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. एलपीजी डिलिव्हरी सेंटर चालू करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही CSC केंद्रासाठी सीएससीच्या https://csc.gov.in/cscspvinfo अधिकृत वेबसाइटवर जाऊन सहजपणे अर्ज करू शकता. तुम्हाला सीएससीची मान्यता मिळाल्यानंतर आपण बँकिंग, विमा, पॅन कार्ड आणि पासपोर्ट बनविण्याची सेवा देऊ शकता. इतकेच नाही तर तुम्ही विजेची बिले भरणे, आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग, शिक्षण व कौशल्य विकास संबंधित अभ्यासक्रमदेखील भरून देऊ शकता. आणि आता सरकार सीएससीमार्फत एलपीजी (LPG) सिलिंडरचे वितरणही करणार आहे, त्याचे मुख्य काम आपल्याला मिळू शकतं.

 

CSC कडून सध्या 21,000 एलपीजी सेंटरचे नियोजन

सध्या CSC कडून देशभरात 21000 एलपीजी केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे, त्यासाठी भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) यांच्याशी करार करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना कॉमन सर्व्हिस सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश त्यागी म्हणाले की, आम्ही बीपीसीएलबरोबर 10,000 एलपीजी वितरक केंद्रे सुरू केली आहेत. तसेच आम्ही एचपीसीएलसोबत 5 हजार आणि इंडियन ऑइलसोबत 5 हजर एलपीजी केंद्र सुरू केली आहेत. आमचा मुख्य लक्ष्य हे ग्रामीण भागात केेंद्रांचा विस्तार  करण्यावर आहे.

सीएससी एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश म्हणाले की, आम्ही अधिकाधिक एलपीजी सेंटर सुरू करीत आहोत कारण ग्रामीण भागत गरीब कुटुंबांना शुद्ध इंधन पुरवणे हा मुख्य उद्देश आहे. सीएससीने ही एलपीजी वितरण केंद्रे सर्व राज्यांमध्ये उघडली आहेत. यापैकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थान ही केंद्रे सर्वात जास्त आहेत.