भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्य वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या नायवाईकांना मध्यवर्ती सह.बँकेकडून आर्थिक मदतव रुग्णांना मार्कस, सॅनिटाइझरचे वाटप

26

भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्य वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या नायवाईकांना मध्यवर्ती सह.बँकेकडून आर्थिक मदतव रुग्णांना मार्कस, सॅनिटाइझरचे वाटप मुल- माहिती व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक,स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षन,व १८ वर्ष वरील युवकांना मतदानाचा अधिकार देणारे भारताचे युवा पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिन व सदभावना दिन म्हणून साजरा करण्यात आला.

तालुका कांग्रेस कमिटीत स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, संचालक अखिल गांगरेड्डीवार,राजेंद्र कन्नमवार, माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे, नगर सेवक विनोद कामडे, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, उपसरपंच राहुल मुरकुटे, यांचेसह

तालुक्यातील व नगरातील कांग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्व.राजीव गांधी यांना पुष्पहार वाहून अभिवादन केले. याच दिनानिमित्य मुल तालुक्यात वाघाने ठार केलेल्या मृतकांच्या नातेवाईकांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अध्यक्ष संतोषशिंह रावत यांचे हस्ते कांतापेठ येथील मृतक कल्पना वाढई यांच्या मुलाला १०,०००/-रुपयाचा चेक देण्यांत आला.

तसेच जानाला येतील मृतक किर्तीराम कुलमेथे यांची पत्नी श्रीमती, विश्रांती कुलमेथे यांनाही १०,०००/-रुपयाचा चेक देण्यात आला. वसंत गेडाम यांचे नातेवाईक कु.दिशा गेडाम यांनाही रावत यांचेहस्ते १०,०००/-चेक देण्यात आला. याप्रसंगी धनराज रामटेके, बापू मडावी उपस्थित होते.