मोठी बातमी! 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश, अद्यापही गडचिरोलीत चकमक सुरूच

40

गडचिरोली, 21 मे: आताची सगळ्यात मोठी बातमी गडचिरोलीतून (Gadchiroli) समोर येते आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही याठिकाणी सर्च ऑपरेशन आणि चकमक सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान तेरा माओवाद्यांना ठार करण्यात आल्याने, पोलिसांचं हे एक मोठं यश मानलं जात आहे. कारण कसनासूर चकमकीनंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 2018 मध्ये 40 माओवादी कसनासूर चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर आज 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

गडचिरोली जिल्हयात महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी कमांडो पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. सुरुवातीला आठ ते दहा नक्षलवाद्यांना ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हा आकडा 13 वर गेला आहे. पैदीच्या जंगलात अजुनही चकमक सुरू आहे. घनदाट जंगल असणाऱ्या या परिसरात काल रात्रीपासून चकमक सुरू आहे.

 

एटापल्लीच्या जंगलातून नक्षलवाद्यांचे 6 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. गडचिरोलीचे डीआईजी संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जणांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

राज्यात एकीकडे करोनाचे संकट सरकार समोर आहे. तर दुसरीकडे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत आठ ते दहा नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कारवाईमुळे गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात ही घटना घडली आहे. गडचिरोली पोलिसांचे सी-60 च्या कमांडो जवान या भागात नक्षल विरोधी अभियान राबवत होते. त्याच भागात कसनसुर नक्षल दलम कार्यरत असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, खात्मा करण्यात आलेल्या नक्षवाद्यांची संख्या वाढू शकते. अद्यापही या भागात शोधमोहिम आणि सुरु असून हा संपूर्ण भाग छत्तीसगढच्या सीमेनजीक असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात नक्षलवाद्यांचा वावर असतो.

काही दिवसांपूर्वीच येथील पोलीस चौकीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. पण, सुदैवाने रॉकेटलाँचरच्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झाले नाही. यानंतरच पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान राबवले होते . या अभियानाअंतर्गतच येथे गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या दरम्यान ही चकमक झाली. नक्षलवाद्यांचे अनेक म्होरके यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे.