माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहिर यांची कोविडकेअर सेंटरला भेट

27

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहिर यांनी आज नगर परिषदेच्या वतीने चालविण्यात येणार्‍या मॉडेल स्कूल येथील कोविडकेअर सेंटरला भेट दिली.हंसराज अहिर यांनी कोविड केअर सेंटर मधील व्यवस्थेची पाहणी केली उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करुन लवकरच कोरोणावर मात केला जाईल असे रुग्णांची चर्चा करताना आश्वस्त केले.

या कोविड केअर सेंटर मध्ये एकूण 91 रुग्ण उपचार घेत आहेत.कोविड केअर सेंटर मधील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेसना भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव केला.हंसराज अहिर यांच्या सोबत मुलच्या कोविड केंद्राला हंसराज अहिर यांची भेट न.प. अध्यक्ष रत्नमाला भोयर,  मुख्याधिकारी सिदार्थ मेश्राम, न.प. उपाध्यक्ष नंदू रणदिवे, प.स.चे सभापती चंदू मारगोणवार, न.प. सभापती प्रशांत समर्थ, कार्यकर्ते तसेच न.प. कर्मचारी उपस्थित होते.