कोरोना काळात मुल तालुक्यातील हजारो गोरगरीबांना मोफत अन्नधान्य तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी लाभ घेण्याचे केले आवाहन

47

 

मूल :— कोरोना काळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केेंन्द्र शासना तर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे,जून या दोन महिन्यासाठी रेशनचे मोफत धान्य वितरीत केले जाणार आहे. तालुक्यातील 23926 लाभाथ्र्यासाठी हजारो क्विंटल धान्य टप्याटप्याने उपलब्ध होत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला.संपूर्ण लॉकडाऊनअसल्याने केंन्द्र शासनाने तीन महिन्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत रेशनचे मोफत धान्य वितरित केले होते. यंदा फेब्रवारी महिन्यापासून दुस—या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून सुरू केली. याच धर्तीवर केंद्र शासनातर्फे देखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंअतर्गत अंत्योदय योजना,प्राधान्य गटातील कुटुंबाना मे व जून या दोन महिन्यांचा कालावधीसाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील लाभाथ्र्यांना गहू 5474.63 क्विटल व तांदुळ 4456.46 क्टिव्ल वितरीत करण्यात येणार आहे.

या मध्ये मुल तालुक्याअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय कुटुंब लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका 23926 आहेत. माहे मे—2021 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे अंत्योदय कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना 35 किलो व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत गहु व तांदुळ याचे वाटप केले जात आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय कुटुब लाभार्थी योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या शिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो गहु व तांदुळ मोफत वाटप केले जात आहे.या मोफत योजने अंतर्गत अंत्योदया कुटुंब लाभार्थी 8161 आहे. त्यांना गहू 1224.15 क्विंटल व तांदुळ 1632.20 क्विंटल तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी 15765 आहेत.त्यांना गहू 1771.68 क्विंटल व तांदुळ 1161.12क्व्टिंल वितरीत करण्यात येत आहेत.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय कुटुंब लाभार्थी 8161 आहेत. 805.83 क्विंटल गहू व 527.60 क्टिवंल तादुळ प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत 15765 ​लाभार्थी आहेत. त्यांना 1673.07 क्विंव्टल गहू व 1115.54 क्विंवटल तांदुळ पात्र धारक लाभाथ्र्यांना वितरीत करण्यात येत आहे. या संपूर्ण मोफत योजनेत एकूण 23926 लाभार्थी आहेत. या लाभाथ्र्यांना एकूण 5474.63 क्विटल गहू व 4456.46 क्विंटल तांदुळ वाटप करण्यात येत आहे.

माहे मे महीण्यात वाटप करण्यात येत असलेल्या पात्र लाभाथ्र्याना मोफत अन्न धान्य वाटप करण्यासाठी तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी यांनी पुरवठा विभागाला अन्न धान्य वाटप करावे असे आदेश दिले.त्या अनुषंगाने पुरवठा निरीक्षण अधिकारी विभावरी अबगड,पुरवठा निरीक्षक तुषार तनपुरे,अव्वल कारकुन ज्योत्सना रामटेके, कनिष्ठ लिपीक बनकर,गोदाम रक्षक सुनिल शेंन्डे यांनी आदेशाचे पालन करून पात्र लाभाथ्र्यांना अन्नधान्य वितरीत करण्यासाठी सहकार्य केले.रेशन दुकानमाधून धान्य वाटप करताना गर्दी होऊ नये म्हणून दुकानदारांनी आवश्यक ती काळजी घ्यावी,अशा सुचना पुरवठा विभागाने दिलेल्या आहेत.

डॉ.रविंन्द्र होळी तहसिलदार
” गेल्या 14 महिन्यापासून कोरोनाच्या माहामारीमूळे महाराष्ट्रात लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. लॉकडाऊन मुळे गरीबाना रोजगार मिळनासे झाले.त्यामूळे गरीबांचे संसार उघाडयावर पडले गरीबांना आधार मिळावा म्हणून शासनाने मे महिन्यापासून अन्नसुरक्षा योजने अंतर्गत मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गरीबांना दिलासा मिळालेला आहे.