चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकरी रुग्णांना आर्थिक मदत

25

मूल- (प्रतिनिधी)    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बँक असून शेतकरी कोणत्याही संकटात सापडला असेल तर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर संतोषसिंह रावत यांची निवड झाली तेव्हा पासून मध्यवर्ती बँक शेतकऱ्याला मदतीचा हात देऊन हिम्मत वाढविण्याचे काम नेहमीच करत आहे.

अशातच मूल तालुक्यातील दाबगांव येथील शेतकरी नेताजी केशव बुरांडे ह्यांना हृदय रोगावर तर चक दूगाला येथील कॅन्सरग्रस्त शेतकरी मारोती तुकाराम वैरागडे यांना प्रत्येकी 40,000/- हजार रुपये उपचारासाठी मदत दिली.

मदतीचा धनादेश मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा जि. प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांचे हस्ते येथील बँकेत देण्यात आले.

याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर,

संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक राकेश रत्नावार,

नगर सेवक विनोद कामडे, सरपंच राहुल मुरकुटे बँकेचे वरिष्ठ अधिकारी नंदुजी मडावी आणि शाखा व्यवस्थापक वाळके उपस्थित होते.