चिचाळा येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू:केंद्राचे उद्घाटन सौ.पुजाताई डोहने मा.प.स. सभापती तथा सदस्या मूल

99

चिचाळा येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू:
प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा अंतर्गत येत असलेल्या उपकेंद्र चिचाळा येथे आज कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. उपकेंद्र चिचाळा हे मूल तालुक्यातील सर्वात मोठे उपकेंद्र असून जवळपास सात हजार लोकसंख्या आहे यात चिचाळा,कवडपेठ, हळदी, ताडाळा इ. गावांचा समावेश होतो. 45 ते पुढील वयोगटातील लोकसंख्या दोन हजार असून येथील लोकांचे लसीकरण झालेले नव्हते नागरिकांची मागणी लक्षात घेता प्रशासनाने 45 वर्षे ते पुढिल वयोगटातील लोकांकरिता चिचाळा येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.पहिल्या खेपेत कोविशिल्ड चे 100 डोस उपलब्ध करून देण्यात आले. सदर लसीकरण केंद्राचे उद्घाटन सौ.पुजाताई डोहने मा.प.स. सभापती तथा सदस्या मूल, सौ जस्मिताताई लेनगुरे सरपंच, यांच्या शुभहस्थे तथा सुरज चलाख उपसरपंच, प्रशांत गट्टूवार तथा ग्रामपंचायत कमिटी चिचाळा, प्रा. आरोग्य केंद्र मारोडाचे वै. अधिकारी डाँ. भांडेकर, डाँ. टोंगे, एचए श्री सोयम, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, यावेळी आरोग्य चमूतील आरोग्य सेविका श्रीमती बडगे, श्रीमती शालिनी दुर्गे, आरोग्य सेवक श्री जाधव, ऑपरेटर श्री वासेकर, विलास लेनगुरे, रामकृष्ण चलाख, अंगणवाडी कार्यकर्त्या बेबीताई चलाख, देवकाबाई पिंपळे, मनीषा गानलेवार, आशा कार्यकर्ती गीता उडान, मीनाक्षी निमगडे, मंदाताई कोडापे, सौ मुरकुटे, सौ पीरसिंगुलवार, मदतनीस मैनाबाई सातपुते, ग्रा प. कर्मचारी मनोज कोतंमवार, विजय केळझरकर इत्यादींनी लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले, मोलाचे सहकार्य केले.