मुल तालुक्यातील नांदगाव येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

42

 

मूल :—
मूल तालूक्यातील नांदगाव येथे वैद्यकिय व्यवसायाची कोणतीही पदवी नसताना देवकुमार तारापद बुधक या बोगस डॉक्टराने मागील अनेक वर्षापासून नांदगाव येथे एका भाडयाच्या खोलीत दवाखाना सुरू केल आहे. दरम्यान,नायब तहसिलदार यशवंत पवार,संवर्ग विकास अधिकारी डॉ मयूर कडसे ​आणि डॉ. सुमेध खोब्रागडे यांनी आपल्या पथकासह नांदगाव येथे जावून देवकूमार बुधक यांच्या दवाखान्याची चौकशी केली असता,तांटिया विद्यापीठ श्री गंगानगर राजस्थान येथे बीचएमएस च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती देवकुमार बुधक यांनी पथकाला दिली.

 वर्षापासून कोणतेही वैद्यकिय प्रमाणपत्र जवळ नसताना खासगी दवाखाना सुरू करून रूग्णांवर उपचार करणा—या देवकुमार तारापद बुधक या बोगस डॉक्टरवर मूल पोलीस स्टेशन येथे शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही पदची डिग्री, शिक्षण नसताना,त्यांनी वैद्यकिय व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनात आले.यावेळी दवाखान्याची झडती घेतली असता,औषध आणि रूग्णांवर उपचार करणरे साहित्य मिळाल्याने ते जप्त केले व दवाखान्याला सील करण्यात आले. आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.