कोरोनाला न घाबरता रक्तदान शिबिर संपन्न

46

कोरेाना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये कोरोनाच्या पाश्चभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. त्या अनुषंगाने रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा मुल वतीने आज दि 16 मे मुल येथे रोजी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.  आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २० रक्तदाते  रक्तदान केले तर ७ प्लाझ्मा दाण्यांची नोंदणी करण्यात आली. उद्घाटन श्री जिवन भाऊ कोंतमवार ,सचिन बल्लावार होते .

तर शिबिराला नगरपरिषदेचे उपाध्यक्ष, नंदू भाऊ रनदिवे ,

नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी भेट दिली.                      प्रास्ताविक, आभार ,संचालन किशोर जी कापगते‌ यांनी पार पाडले  स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.आरोग्य अधिकारी,वैधकीय अधिकारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राबवित असलेला रक्तदानाचा उपक्रम स्वागतार्ह आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .