आधार कार्ड नसल्यास व्हॅक्सीन आणि आवश्यक सेवा देण्यास नकार देता येऊ शकत नाही : UIDAI

56

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) शनिवारी म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला लस देणे, औषध देणे, हॉस्पिटलमध्ये दाखल करणे किंवा उपचार करण्यासाठी केवळ या कारणामुळे नकार देता येऊ शकत नाही की, त्याच्याकडे आधार कार्ड नाही. कोणतीही आवश्यक सेवा उपलब्ध करूण देण्यास नकार देण्यासाठी आधार कार्डचा बहाणा करू नये.

देशात कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेदरम्यान युआयडीएआयचे वक्तव्य खुप महत्वाचे ठरले आहे. युआयडीएआयने एका वक्तव्यात म्हटले की, आधारच्या बाबतीत मान्य अपवाद आहे की ज्याचा 12 अंकाचा बायोमीट्रिक आयडी नसेल तरी सेवा आणि लाभ देण्याचे पालन केले पाहिजे.

त्यांनी म्हटले की, जर एखाद्या नागरिकाकडे काही कारणामुळे आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड नियमांतर्गत त्यास सेवा प्रदान करण्यास नकार देता येऊ शकत नाही. आधार कार्ड नसल्याने अनेक कोरोना रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासारख्या सेवांपासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. युआयडीएआयने स्पष्ट केले की, आधार कार्ड नसल्याने कोणत्याही व्यक्तीला लस, औषध, हॉस्पिटलमध्ये दाखल करणे इत्यादीसाठी नकार दिला जाऊ शकत नाही.