उदरनिर्वाहाचे साधन आणि मार्ग हरविलेल्या गरजवंताच्या मदतीसाठी आज काँग्रेसचे स्थानिक नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी अन्नपुर्णा थालीचा उपक्रम सुरू केला

50

मूल (प्रतिनिधी) कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्या लाँक डाऊन मूळे उदरनिर्वाहाचे साधन आणि मार्ग हरविलेल्या गरजवंताच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत असतांना आज काँग्रेसचे स्थानिक नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी अन्नपुर्णा थालीचा उपक्रम सुरू केला आहे.

मूल तालुका काँग्रेस पार्टीच्या सहकार्यानेसंतोषसिंह रावत यांनी सुरू केलेल्या अन्नपुर्णा थालीच्या उपक्रमातंर्गत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्थानिक काँग्रेस भवन समोर गरजवंताना भोजनाचे पार्सल दिल्या जाणार आहे. सदर उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी ११ वा. काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे हस्ते झाला.

 

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, महीला अध्यक्ष रूपाली संतोषवार, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, नगर सेवक विनोद कामडे, ललिता फुलझेले, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनिल शेरकी, तालुका देखरेख सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार, संचालक किशोर घडसे, क्रांती ज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष गुरू गुरनुले, युवक काँग्रेसचे विवेक मुत्यलवार, पंकज महाजनवार, व्यंकटेश पुल्लकवार आदी उपस्थित होते.

अन्नपुर्णा थाली सोबतच संतोषसिंह रावत यांनी काँग्रेस भवन येथेच लसिकरण नांव नोंदणी आँनलाईन सेवा केंद्र कार्यान्वित केले असुन मागील पंधरा दिवसांपासुन आँक्सीजन अँम्बुलन्स आणि दोन खाजगी रूग्णवाहीका नागरीकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासोबतच स्थानिक प्रशासनाला मागणी नुसार आँक्सीजन सिलेंडर, सर्जीकल ग्लोज आणि मास्क उपलब्ध करून देत आहेत.