अनुदानावारील बियाणांसाठी अर्जाला 15 मे पर्यंतच मुदत

25

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया,भात,तुर,मूग,उडीद ,मका, बाजरी,

मूल :— कोरोना महामारीतच शेतक—यांच्या खरीप हंगामाला सुरूवात होत आहे. याकरिता शासनाने महा—डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतक—यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे.
या प्रणालीव्दारे शेतक—यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र देण्यात आले आहे
शेतक—यांनी शेती निगडित ​विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना अंतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्याकरीता शेतक—यांना आता एकच अर्ज करावा लागणार आहे.

या सुविधाअंतर्गत लाभाथ्र्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया,भात,तुर,मूग,उडीद ,मका, बाजरी,आदी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून 15 मे 2021 पर्यंत शेतक—यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.
महाडीबीटी पेार्टलच्या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडूण शेतकरी स्वताच्या मोबाईल,संगणक/लॅापटॉप/ टॅंबलेट/,वरून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणा—या सर्व शेतक—यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.