कोविड – 19 लसीकरण रजिस्ट्रेशनसाठी (नोंदणीकरीता) आपले सरकार सेवा केंन्द्र वर मोफत सुविधा चालू करावी.  —नगराध्याक्षा प्रा.रत्नमाला भोयर

40

 

मूल :-   ग्रामीण भागातील 18 वर्षावरील नागरीकांच्या लसीकरणासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याकरीता अडचण निर्माण होत आहे. कधी नेटवर्क अडचण तर कोणाजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही.तसेच आॅनलाईन रजिस्ट्रेशनमुळे स्थानिक नागरिकांनाच लसीचा लाभ मिळत नाही ही मुल तालुक्यातील 18 वर्षावरील नागरीकांची वस्तुस्थिती आहे.

हि अडचण पाहता स्पॉट रजिस्ट्रेशनने स्थानिक नागरिकांना मूल शहरात व तालुक्यात लसीचा लाभ मिळावा तसेच ग्रामीण भाागातील नागरीकांच्या सोयीसाठी शासनाने नेमून दिलेल्या आपले सरकार सेवा केंन्द्र व सी.एस.सी.केंद्र या ठिकाणी कोविड लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून परवाणगी दयावी अशी मागणी नगर परिषद मूल च्या अध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आपले सरकार सेवा केंद्र व सी.एस.सी. केंद्रांना परवानगी दिल्यास स्थानिक नागरिकांना कोरोना लसीपासून वंचित राहावे लागणार नाही.व नागरीकांना आर्थीक,मानसिक,शारीरीक त्रास होणार नाही. स्थानिक व ग्रामिण जनतेचा विचार करून उपरोक्त समस्या त्वरीत सोडवावी व जनतेच्या भावनेचा विचार करून सहकार्य करावे.

मुल तालुक्यात 18 ते 44 वर्षे वयोगटाच्या लसीकरणासाठी आॅनलाईन नोंदणी व त्याकरीता केंद्र मिळविणे कमालीच्या अडचणीचे ठरले आहे.आॅनलाईन नोंदणी अवघ्या पाच मिनिटांत हाऊसफुल होत असल्याने मुल शहरातील व ग्रामीण भागातील नागरीक लसी पासून वंचीत राहू नये याकरीता नोंदणी केंन्द्र आपले सरकार केंन्द्र वर उपलब्ध करून देण्यात यावे.                                                असे निवेदन नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनी मूल चे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर व मान. सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी वित्तमंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांना पाठविण्यात आले आहे.