महाडीबीटी पोर्टल बियाणे या घटकासाठी शेतक—यांचे अर्ज घेण्यास सुरूवात अंतीम तारीख  15 मे 2021

49

 

मूल(प्रमोद मशाखेत्री) :— महा—डीबीटी पोर्टलवर ”शेतकरी योजना ” या सदराखाली शेतक—यांच्या
सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ ”एकाच अर्जाव्दारे ”देण्याच्या दुष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीव्दारे शेतक—यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र देण्यात आले असून शेतक—यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पेार्टल वर ”शेतकरी योजना ” या शीर्षकाअंतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीर्नी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया,भात,मूग,उडीद,मका,बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून 15 मे 2021 पर्यंत शेतक—याने अर्ज करणे बंधनकारक आहे.

महा—डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वताच्या मोबाईल,संगणक,/लॅपटाप/टॅबलेट,सामुदायीक सेवा केंन्द्र ,ग्रामपंचायतीतील संग्राम केंन्द्र इ.माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणा—या सर्व शेतक—यांना त्याचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकतयाकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टल मध्ये नमूद करून त्यांना योजनासाठी अर्ज करता येईल.
          अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पेार्टल मध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल,त्याशिवाय त्यांना अनुदानाचा वितरण करण्यात येणार नाही.सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंन्दा्ची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास या ईमेल वर किंवा 020—25511479 या दुरध्वनी क्रमाकावर संपर्क साधावा असे आवाहन धीरज कुमार आयुक्त कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.