नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्या विरूध्द नगर प्रशासनाची धडक कारवाई

43

मूल : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ब्रेक दी चैन अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करून काही विक्रेते व्यवसाय करीत असल्याने नगर प्रशासन त्यांचे विरूध्द अँक्शन मोड मध्ये आली आहे. मिळालेल्या माहीती वरून मूल नगर परीषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचे नेतृत्वात भरारी पथकाने मनोज ट्रेडींग कंपनीचे संचालक संदीप अग्रवाल यांचे विरूध्द कारवाई केली आहे. संदीप अग्रवाल यांचे विरूध्द यापुर्वी दोनदा दंडात्मक कारवाई झाली. असे असतांना संदीप अग्रवाल हे प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकुन साहित्य विक्री करीतचं होते. यामुळे नगर प्रशासनाने संदीप अग्रवाल यांच्या मनोज ट्रेडींग कंपनीला सिल ठोकले असुन अग्रवाल यांच विरूध्द पोलीसात तक्रार नोंदविल्याने त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत महालक्ष्मी हार्डवेअरचे संचालक दिनेश गोयल ह्यांचे वर मार्गावर उभ्या असलेल्या ट्रक मधुन ग्राहकास सिमेंट विकत असल्याचे कारणावरून ५ हजार रूपये दंड आकारला आहे. मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचे नेतृत्वात प्रशासकीय अधिकारी तुषार शिंदे आणि विलास कागदेलवार, शहर अभियंता विशाल मुळे, कनिष्ठ लिपीक राजु पुद्दटवार, देवराव भिमनवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कारवाई केल्याने प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकुन व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

काल ह्याच भरारी पथकाने स्नेहल होजीअरी स्टोअर्स विरूध्द कारवाई करून गोदामाला कुलुप लावले होते. आज ह्याच पथकाने अँक्शन मोड मध्ये येवुन दोन व्यापाऱ्या विरूध्द कारवाई केल्याने अनेक व्यापाऱ्यांनी अँक्शन मोड मध्ये आलेल्या मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम आणि पथकातील सहका-यांचे आभार मानले आहे.
दरम्यान नगर प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईवर महालक्ष्मी हार्डवेअरचे संचालक दिनेश गोयल यांनी नाराजी व्यक्त केली आहे, शासनाने बांधकाम करण्यास परवानगी दिली असताना दुसरीकडे माञ बांधकामास आवश्यक असलेले सिमेंट, लोखंड आदी साहीत्य विक्रीवर बंदी आणली आहे, त्यामुळे परवानगी असतांना आवश्यक साहीत्या अभावी बांधकाम करायचे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीसुद्धा आपण शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत असुन वरीष्ठ अधिकाऱ्यांची मुक संमती घेवुनच दुकान न उघडता आँनलाईन मागणी नुसार ट्रक मधुन परस्पर गरजु व्यक्तीला १० बँग सिमेंट देत असताना नगर प्रशासनाच्या भरारी पथकाने आपल्या विरूध्द दंडात्मक कारवाई केली, दुकान बंद असताना भरारी पथकाने दुकान सुरू करून विक्री करीत असल्याचे पावती मध्ये नमुद करावे, ही कृती आश्चर्यकारक असुन आपल्यावर अन्याय करणारी असल्याचे मत दिनेश गोयल यांनी व्यक्त केले.