मूल येथील कापड विक्रेत्याचे गोडावुन सिल. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे सर्रासपणे उल्लंघन

57

मूल : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ब्रेक दी चैन अंतर्गत जीवनावश्यक वस्तुंचे दुकान वगळता शहरातील इतर सर्व दुकान बंद ठेवण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तुची दुकान सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत सुरू राहत असल्याची संधी साधुन शहरातील काही व्यवसायी जीवनावश्यक साहीत्या सोबतचं इतर साहीत्याची विक्री करून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे सर्रासपणे उल्लंघन करीत आहेत.

नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या शहरातील त्या विक्रेत्या विरूध्द व्यापारी वर्गात नाराजी असुन प्रशासनाने अश्या विक्रेत्याविरूध्द कारवाई करावी.,अशी मागणी केल्या जात आहे. दरम्यान जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ११ वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असल्याची संधी साधुन शहरातील काही कापड, इलेक्ट्रिक साहीत्य, जनरल साहीत्य विक्रेते समोरून शटर बंद करून मागील दाराने तर कोणी गोडावुन मधुन साहीत्य विक्रिचा व्यवसाय सुरू केला आहे.

                                     रविवारला शहरातील सर्व व्यापारपेठ बंद राहत असतांना शहरातील स्नेहल होजीअरी स्टोअर्स चे संचालक केशवाणी हे दुकाना मागील बोरकर यांचे घरी असलेल्या गोडावुन मधुन रेडीमेड कपड्याची विक्री करीत असल्याची माहीती नगर प्रशासनाच्या मास्क कारवाई पथकाला मिळाली, त्याआधारे पाळत ठेवुन आज सकाळी १० वा. चे सुमारास मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांचे मार्गदर्शनात मास्क कारवाई पथकातील तुषार शिंदे, विशाल मुळे, विलास कागदेलवार, प्रभाकर एडनुत्तलवार, प्रकाश भिनवार आदींनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केशवाणी यांना गोडावुन मधुन कपड्यांची विक्री करतांना रंगेहात पकडले.

                                        ब्रेक द चैन मुळे वस्तु विक्रीची परवानगी नसतांना केशवाणी हे गोडावुन मधुन वस्तुंची विक्री करतांना सापडल्याने त्यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली असुन गोडावुनला मोहोरबंद कुलुप लावले आहे. नगर प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्या विरूध्द कारवाई केल्याने शहरातील काही विक्रेत्यांचे धाबे दणाणले असले तरी अनेकांनी माञ नगर प्रशासनाने केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे.