ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड तात्काळ उपलब्ध करण्यात यावे:- राजु झोडे

36
मुल :- येथील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय असा दर्जा दिला  आहे. परंतु अजूनही मुल येथील रुग्णालयाला ऑक्सीजन बेड व वेंटीलेटर बेड नसल्यामुळे कोविड  रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये RTPCR चाचणीची सोय नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी चाचणीकरिता यावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने  कित्येक रुग्ण कोरोनाची चाचणी न करताच घरगुती उपचार करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि याच्यातच कित्येक रुग्णांचे कोरोनाचा प्रसार वाढुन जीवही जात आहे. ग्रामीण भागात विलगीकरण कक्ष नसल्याने काही रुग्णांना घरच्यांच्या संपर्कात राहूनच उपचार करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग सर्व कुटुंबाला होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सदर बाबीकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असून उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मुल येथे किमान १०० ऑक्सिजन बेड व २० व्हेंटिलेटर बेड तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येसुद्धा RTPCR चाचणी करण्यात यावी व १० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात यावे अशा आरोग्याच्या मूलभूत मागण्यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी तहसीलदार मुल यांचे मार्फत आरोग्य मंत्री यांनी दिले.
        सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा वरील मागण्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजु झोडे यांनी शासन व प्रशासनाला दिला. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, प्रशांत उराडे, रोहित बोबाटे,सुरज टिकले उपस्थित होते.