सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी पलींद्र सातपुते

30

मूल : राज्यातील ग्राम पंचायतीच्या सर्वांगिण विकासा करीता काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मूल तालुक्यातील उथळपेठ येथील सरपंच पलींद्र सातपुते यांची तर राज्य कार्यकारीणी सदस्य म्हणुन जिल्ह्यातील छोटा नागपूर येथील उपसरपंच वृषभ दुपारे यांची राज्य अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी नियुक्ती केली आहे. सरपंच पलींद्र सातपुते हे भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी असुन तेली समाजाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. सातपुते यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर येत्या काही दिवसात ग्राम संवाद सरपंच संघटनेच्या जिल्हा कार्यकारीणीची निवड करण्यात येणार असुन त्यामाध्यमातुन जिल्ह्यातील ग्राम पंचायतींचा सर्वांगीण विकास साधल्या जाणार आहे.