१८ पेक्षा अधिक वयापासून ४५ पेक्षा कमी वयाचे नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात

31

नम्र आवाहन
मूलवासीय जनतेला नम्र आवाहन करण्यात येते की,
लस उपलब्धतेनुसार उद्या दिनांक ६/५/२०२१ पासुन मुल शहरात ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण उपजिल्हा रुग्णालय, मुल व मा. सा. कन्नमवार सभागृह, मुल येथे सकाळी 10 वाजतापासून सुरु राहील.
यासोबतच मा. सा. कन्नमवार सभागृहात १८ पेक्षा अधिक वयापासून ४५ पेक्षा कमी वयाचे नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात येत आहे. सदर १८ ते ४५ पेक्षा कमी या वयाकरिताचे लसीकरण ऑनलाईन नोंदणी करुनच होईल. सदर नोंदणी नुसार दिलेल्या वेळेतच यावे. अनावश्यक गर्दी करु नये. याची नोंद घ्यावी.

लसिकरणास येतांना उपाशी येवू नये. येतांना पिण्याचे पाणी सोबत आणावे.

सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास, चव न समजणे, गंध न समजणे यासारखी लक्षणं जाणवत असल्यास लसिकरण केंद्रावर नोंदणी करतांना तसेच वैद्यकीय अधिकारी यांचे निदर्शनास आणून द्यावे.स्वत:चे लसिकरण करुन कोरोना विरुद्ध लढ्यात आपला सकारात्मक सहभाग नोंदवा…..”आपण सुरक्षित तर देश सुरक्षित ” 🙏🏼🙏🏼

नगराध्यक्षा
प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर
मुल नगर परिषद