उपजिल्हा रुग्णालय मूल येथे ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

59

उपजिल्हा रुग्णालय मूल येथे ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश
मूल :-
केंद्रीय भूतल परिवहन मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते नामदार नितीन गडकरी यांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर राज्याचे माजी वित्त , नियोजन व वनमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिले आहेत.

आज दिनांक ५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सुपूर्द करण्याचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी मूलचे पोलीस उपविभागीय अधिकारी अनूज तारे यांनी फित कापून उद्घाटन केले . आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल तालुक्यासाठी 20 ऑक्सीजन कॉन्सनट्रेटरची व्यवस्था करण्याचे शब्द दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी केंद्रीय भूतल व परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली. नामदार नितीन गडकरी यांनी ही मागणीवजा विनंती तात्काळ मंजूर करून मूल तालुक्याला ऑक्सिजन कॉन्सन ट्रेटर देण्याचे मान्य केले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालय मुल येथे दहा ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले.

आणखी १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचा पुरवठा करण्यात येणार आहे. मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होताना दिसत आहे. ही पातळी कमी होऊ नये व रुग्णाला निरंतर ऑक्सिजन मिळत राहावे यासाठी ऑक्सीजन कॉन्सनट्रेटरच्या साह्याने रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जातो. हे यंत्र थेट हवेतून ऑक्सिजन शोषून घेते व रुग्णाला शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करते. “दिला शब्द पूर्ण केला” या वचनाप्रमाणे मूल तालुक्याला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून

दिल्याबद्दल येथील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक व स्थानिक प्रशासनाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

या कार्यक्रमाला नगर परिषद मूलचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, पाणीपुरवठा सभापती अनिल साखरकर नगरसेवक महेंद्र करकाडे,उपजिल्हारुग्णालय मूल चे प्रभारी अधीक्षक डॉ. उज्वल इंदूरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबाटे , किशोर कापगते उपजिल्हा रुग्णालय मूल चे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.