वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी जानाळा येथील बफर झोन क्षेत्रात

68

वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी
मूल :— तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना जानाळा येथील बफर झोन क्षेत्रात मंगळवारी ता 4 सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली.गंभीर जखमी झालेल्या या महिलेला चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.वनिता वसंत गेडाम (वय25) असे जखमी महिलेचे नाव आहे.
जानाळा येथील चार—पाच महिला तेंदूपाने तोडण्यासाठी जानाळा तलाव परिसरातील वाघलोधी या भागात सकाळी गेल्या होत्या.
पाने तोडत असताना तलावाच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या एका वघिनीच्या बछडयाने वनिता गेडाम यांच्यावर हल्ला चढविला. तिच्या सोबतच्या महिलांनी आरडाओरड केल्याने बछडयाने जंगलाच्या दिशेने पळ काढला. ​वनिता गेडाम यांच्या पाठीवर, छातीवर तसेच हाताला गंभीर इजा झाली आहे. घनतेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आनंदराव कोसरे आणि कर्मचा—यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक उपचारासाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात वनिता यांना दाखल केले.
मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात ह​लविण्यात आले. जानाळा तलाव आणि जानाळा परिसर बफर झोन क्षेत्रात येत असल्याने येथील घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मोठया प्रमाणात मुक्तसंचार आहे. तलावाच्या परिसरात एका बछडयासह या वाघणीचे वास्तव्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार, 4 मे रोजी चिचपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या जानाळा गावालगतच्या वागलोधी तलावाजवळ घडली. वनिता वसंत गेडाम असे जखमी महिलेचे नाव आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील ग्रामस्थ तेंदूपत्ता हंगामात व्यस्त असतात. भल्या पहाटेच तेंदूपत्ता तोडणीसाठी जंगल गाठतात. जखमी महिला काही महिलांसोबत तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्या हल्ला केला. लगतच्या अन्य ग्रामस्थांनी आरडाओरड केली. काठ्या घेवून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. जखमी महिलेला लागलीच मूल उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद वनविभागाने घेतली आहे.